जागृत देवस्थानच्या नवनिर्मानीत गुंतले भादेकर, काम प्रगतपथावर
बी डी उबाळे
औसा: भादा तालुका औसा येथील जागृत देवस्थान अशी महती पंच क्रोशीत असून मुख्य चौकात असलेल्या नागोबा मंदिराचे काम तरुणाईच्या मदतीने जोरदार सुरू असून या कामी एक तरुणांची मोठी चळवळ उभी करून हे काम सर्वधर्मसमभाव याच हेतूने सुरू असून गावकरी ही मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीसह मोठे सहकार्य करत असल्याचे चित्र सध्या भादा येतील जागृत देवस्थानचे नवनिर्माण करीत असताना दिसून येत आहे.
दोनच दिवसापूर्वी हे मंदिर व्यवस्थित जुनाट बांधकामांमध्ये उभे होते याचे नूतनीकरण आणि नवनिर्माण करण्यासाठी या टीम मधून सर्व सामाजिक कार्यकर्ते वजा भादेकर स्वयंप्रेरणेने काम करीत असून या कामासाठी मोठा निधी कसा उभा राहील.
याकडेच सर्वांचे लक्ष वेधले गेले असून हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल कारण सध्या ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार हे शेतीशीच निगडित आहेत परंतु शेतामधील उत्पन्न हे पूर्णपणे पावसाच्या भरोशावर पाण्यातच गेले आहे.यामुळे शेतातील यावर्षीचे उत्पन्न किती निघेल याची चिंता लागली असतानाही या मंदिराच्या नवनिर्माणीसाठी निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होत आहे.
याच धरतीवर या कामाचा पुढील टप्पा सुरू आहे. आणि भादेकरांच्या नगरीमध्ये हे नवनिर्माण होत असलेले जागृत देवस्थान भव्य नागोबा मंदिर प्रत्यक्ष भाविकांच्या सेवेमध्ये सादर होईल असे सध्या सुरू असलेल्या कामाच्या वेगावरून चित्र दिसून येत आहे.



0 Comments