खुर्ची पसंद और किराये के ट्टूओ ने माहोल खराब किया है, वरना सभी मुल्कों के लोग अमन से जिना चाहाते हैं...
औसा: दि.22 शहरातील मौलाना आझाद चौकात जलसा -ए- सीरातून नबी आयोजित करण्यात आला होता. यात मौलाना मोहम्मद अब्दुल कवी साहेब यांनी म्हटले की प्रत्येक देशातील नागरिक शांततेने जगू इच्छितात. परंतु काही स्वार्थी लोकांमुळे व चुकीच्या पद्धतीने वागणाऱ्या माध्यमांमुळे आपापसामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. ज्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. म्हणून सर्वांनी आपापल्या धर्मानुसार आचरण करून एकमेकांशी प्रेमाने वागावे. असा संदेश यावेळी कवी साहेब यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येने शहरातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते पुढे बोलताना कवी साहेब म्हणाले की प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात चुकीच्या माहिती देऊन आपापसामध्ये द्वेष निर्माण केला जात आहे. प्रेषित पैगंबरांनी आपल्या सर्व आयुष्यात जनतेच्या भल्यासाठी आयुष्य वेचणल्याचे त्याने सांगितले. आपल्या उम्मत साठी संपूर्ण आयुष्य कशा पद्धतीने व्यतीत केले हे सविस्तर त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचे आयुष्य जगावे हे प्रत्यक्ष प्रेषितांनी आपल्या आयुष्यात दाखवून दिले.ज्यांचे पैगंबर मुहम्मद पैगंबर यांच्यावर प्रेम नाही तो ईश्वरावर देखील प्रेम करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रेषितांनी सांगितलेल्या मार्गावर चालून ईश्वर प्राप्त करावा असा संदेश यावेळी दिला.
पूर्वी कोठेही प्रार्थना करायला परवानगी होती. आज स्थितीत बंधने येत असल्याची चिंता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी दुवा करून समारोप करण्यात आला. शहरातील मौलानांनी या कार्यक्रमांत येणार्यांचे आभार व्यक्त केले.




0 Comments