Latest News

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गैरसोय दुर करण्यासाठी आगार प्रमुखांना घातले साकडे

ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या गैरसोय दुर करण्यासाठी आगार प्रमुखांना घातले साकडे


शेख बी जी.

औसा: दि.10 - तालुक्यातील मौजे भादा येथून शिक्षणासाठी जवळपास शंभर ते दीडशे विद्यार्थी दररोज प्रवास करत असतात. शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर तासिका भेटत नसल्याची तक्रार गावातील ग्रामपंचायत सदस्य अमोल पाटील यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली. तात्काळ सदस्य अमोल पाटील यांनी औसा येथील आगारप्रमुखांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे गर्‍हाणे मांडले.

मागील तीन महिन्यापासून विद्यार्थ्यांना शाळेसाठी उशीर होत असल्याने शैक्षणिक नुकसान होत असल्याचे आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर येथील आगार प्रमुख अजय गायकवाड यांनी बसची वेळेवर सोय केली जाईल असे अभिवचन दिले व यापुढे कसलीच गैरसोय होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे सांगितले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक कठारे, शिवलकर, प्रेम लटुरे, अमोल पाटील आदी नागरीकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे. हे गर्‍हाणे मांडण्यासाठी गावातील 25 ते 30 विद्यार्थी आगार प्रमुखांच्या भेटीसाठी प्रत्यक्ष गेल्याने येथील आगारप्रमुखांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे अभिवचन दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांचे आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments