Latest News

6/recent/ticker-posts

औसा शहरातील कुत्रे व वराह यांचा बंदोबस्त करावा यासाठी दिले निवेदन

औसा शहरातील कुत्रे व वराह यांचा बंदोबस्त करावा यासाठी दिले निवेदन


शेख बी जी.

औसा: दि.10 - औसा शहरांमध्ये मागील अनेक दिवसांपासून मोकाट कुत्रे व वराह(डुकरे) जास्त झाल्याने यांचा योग्य तो बंदोबस्त करावा अशा आशयाचे निवेदन आज दिनांक 10 रोजी विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष खुनमीर मुल्ला यांनी मुख्याधिकारी यांना दिले.निवेदनात असे म्हटले आहे की शहरात कुत्रे व वराह(डुकरे) अधिक झाल्याने वयोवृद्ध नागरिक व मुलांना याचा त्रास होत आहे. वारंवार पालिकेला निवेदन देऊनही पालिका याबाबत गंभीर नाही. लहान मुले, महिलांना घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे.यामुळे पालिकेने ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा असे निवेदनात म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा विलासराव देशमुख युवा मंचचे अध्यक्ष खूनमीर मुल्ला यांनी हे निवेदन दिले.



Post a Comment

0 Comments