Latest News

6/recent/ticker-posts

रस्त्यासाठी भादेकरांचे आंदोलन सोशल मीडियाचा पाठपुरावा, आमदारांची मेहर नजर भादा ते समदर्गा मोड रस्त्याचे काम सुरू

रस्त्यासाठी भादेकरांचे आंदोलन सोशल मीडियाचा पाठपुरावा, आमदारांची मेहर नजर भादा ते समदर्गा मोड रस्त्याचे काम सुरू

बी डी उबाळे

औसा: औसा-भादा या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात या रस्त्यासाठी नागरिकांचे मते मतांतरे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडण्यात आली.

याची दखल घेत भादा ते संमदर्गा मोड या 6 किमी अंतराच्या रस्त्याचे काम नुकतेच पावसामध्येही साईड पट्ट्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे हे काम सुरू झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला असून नुकतेच केलेले भादा येथील दोन ग्रामपंचायतचे अमोल पाटील आणि सूर्यकांत उबाळे या दोन सदस्य यांच्या नेतृत्वाखाली टीम एकत्रित येऊन यांनी शारीरिक कष्ट देऊन स्वतः आणि सोबत काही मोजके भादेकर नागरीक यांनी या भागाशी संबंधित असणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश आप्पा कराड आणि खास लातूर ग्रामीण ला जोडलेला हा बहदा भाग असल्याने त्याचे आमदार धीरज देशमुख या तिन्ही आमदारांना पायी जाऊन निवेदन पोहच केले. यामुळे या भागांमध्ये या रस्त्याची मोठी चर्चा सोशल मीडियावर झाली होती आणि नुकतेच हे काम सुरू झाल्याने केलेले आंदोलन आणि सोशल मीडियावर रस्त्याची दुर्दशा आणि वाहनांचे होत असलेले मोठे हाल याची मोठ्या प्रमाणात चर्चा होती आणि हा प्रश्न विविध वृत्तपत्रानेही लावून धरल्याने आणि या भागावर सदरील आमदारांची मेहर नजर झाली काय अशी चर्चा असून हा रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.यामुळे या भागातील नागरिक प्रशासन आणि शासन यांचे आभार व्यक्त करीत असून हा मंजूर करण्यात आलेला अर्धा रस्ता काम सुरू झाले आहे. तो रस्ता पूर्ण 12 किमी करण्यात यावा याकरिता संबंधित आमदारांनीही या नागरिकांच्या अडचणीची जबाबदारी स्वीकारून पुढील अर्धे काम पूर्ण करावे अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments