Latest News

6/recent/ticker-posts

रसिका शैक्षणिक संकुलामध्ये कै. आबासाहेब भोपणीकर साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

रसिका शैक्षणिक संकुलामध्ये कै. आबासाहेब भोपणीकर साहेब यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) येथील रसिका शैक्षणिक संकुलामध्ये जनसेवा सेवाभावी प्रतिष्ठान भोपणीचे संस्थापक सचिव कै. आबासाहेब भोपणीकर यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांच्या हस्ते कै. आबासाहेब भोपणीकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. व दोन मिनीटे मौन पाळून आदरांजली वाहण्यासाठी आली. यावेळी प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे, आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया अनिल कांबळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के उपप्राचार्य डॉ. सत्यवान सोनटक्के, देवणी येथील नगरसेवक जाफरभाई मोमीन, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अमरदीप बोरे, लासोना येथील उपसरपंच अंकुश माने, प्रशांत घोलपे, रशीदभाई मल्लेवाले, प्रताप कोयले यांच्यासह देवणी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कै. रसिका महाविद्यालय व आबासाहेब इंग्लिश स्कूल येथील शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments