Latest News

6/recent/ticker-posts

आनंदाचा शिधा वाटपास निटूरात सुरुवात

आनंदाचा शिधा वाटपास निटूरात सुरुवात

माझं लातूर परिवाराच्या सदस्यांच्या हस्ते एस.आर. काळे रा.भा.दुकान मलरडवाडी (निटूर) येथील रेशन दुकानात वितरण


लातूर: सर्वसामान्य लोकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्य सरकारने आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. हा आनंदाचा शिधा एस.आर. काळे रा.भा.दुकान मलरडवाडी (निटूर) ता.निलंगा दु. क्र .०४ मशीन क्र.१०६ रेशन दुकानांच्या माध्यमातून पात्र शिधाधारकांना वाटप करण्यात येत आहे. यात रवा, चणा डाळ, साखर प्रत्येकी १ किलो आणि पामतेल याचा समावेश असून हे किट फक्त शंभर रुपये या नाममात्र दरात लाभार्थ्यांना दिले जात आहे.

 
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष के वाय पटवेकर, माजी सरपंच महादेविताई सुतार ,दक्षता कमिटेचे सदस्य, विविध कार्यकारी सोसयटीचे संचालक तथा पत्रकार राजकुमार सोनी पत्रकार, नामदेव तेलंगे, माजी सरपंच सुभाष वल्लेकर, माजी पोलिस पाटील भरत ढोबळे यांच्या हस्ते पात्र शिधाधारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात आला. 

यावेळी ग्रा. पं.सदस्य राजकुमार चव्हाण ,रा.भा.दुकान दार एस.आर.काळे, पोस्ट खात्याच्या कर्मचारी आरती काळे, सामाजिक कार्यकर्त्या एस. एस.काळे, ग्रा. पं.कर्मचारी राम जाधव व कार्डधारक, दक्षता कमिटीचे सचिव तलाठी आर.बी. कुलकर्णी, महसूल कर्मचारी सतीश बसवणे, सामाजिक कार्यकर्ते बी. एन. डांगे यांच्यासह पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments