Latest News

6/recent/ticker-posts

अनेक वर्षापासून होता वाट सरूला त्रास औसा कॉर्नरणे घेतला मोकळा श्वास

अनेक वर्षापासून होता वाट सरूला त्रास औसा कॉर्नरणे घेतला मोकळा श्वास


बी डी उबाळे

औसा: औसा येथील भादा रोड कॉर्नर ने घेतला मोकळा श्वास अशी आवस्था झाली आहे.

औसा येथून सुरू होणारा औसा भादा रस्तां त्या कॉर्नर वरती नुकतेच जेसीबीच्या साह्याने जुने काटेरी वृक्ष काढण्यात आले यामुळे रस्त्याने घेतला मोकळा श्वास घेतला अशी अवस्था या रस्त्याची आवस्थ निर्माण झाली असून गेल्या कित्येक वर्षापासून हे वृक्ष रस्त्यावरती दाठी वाटी करून रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तीस अडचण निर्माण करून उभे होते.

यामुळे अनेक वाहनधारकांना या ठिकाणाहून जात असताना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत होता तर या ठिकाणी दोन वाहने जर समोरासमोर आली तर रस्ता देणे खूप कठीण झाले होते.कारण या कॉर्नर वरती मोठ्या प्रमाणात वृक्षांनी अतिक्रमण केले होते यामुळे वाहनाला पास होण्यासाठी रस्ता देणे कठीण होते परंतु रविवार दिनांक 23 ऑक्टोबर 20 22 रोजी या ठिकाणी चे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मदतीने काढण्यात आले असल्याचे समजते.

यामुळे हा भाग अत्यंत धोकादायक आणि घातक अशा स्वरूपाचा होता कारण या ठिकाणी किंचितही रस्ता पाणी जाण्यासाठी नाही यामुळे या ठिकाणी येणारे औसा तांडा आणि अलीकडील शेत जमिनीचे पाणी मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून वाहून जात असल्याने हा रस्ता सतत खचला आणि मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याचे दिसून येत होते परंतु आज या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने हे काटेरी वृक्ष काढल्याने हा रस्ता अगदी मोकळा श्वास घेत असून वाहनधारकांनाही या रस्त्यावरून जाण्यासाठी आता कोणतेही जोखीम किंवा रिस्क घेण्याची आवश्यकता दिसून येत आहे तर हा रस्ता स्वच्छ आणि मोकळा झाल्याने प्रवासी मात्र सुटकेचा निष्वास सोडत आहेत आणि संबंधित ज्या अधिकारी कर्मचारी वर्गणी हे काम प्रत्यक्ष जागेवर थांबून रस्ता वाहतूक मोकळी व्हावी याकरिता कष्ट घेतले त्या अधिकारी,कर्मचारी या सर्वांचे अभिनंदन या रस्त्यावरून जाणारा प्रत्येक प्रवासी नागरिक करीत आहे.

Post a Comment

0 Comments