सावधानतेचा इशारा
मांजरा / तेरणा नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. / आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास संपर्क साधांवा
लातूर: मागील काही दिवसांत होत असलेल्या पावसामुळे मांजरा प्रकल्प 92 टक्के आणि तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने 100% भरले असून दोन्ही धरणात अजून येवा सुरु असून तेरणा धरणातील अतिरिक्त पाणी नदीद्वारे तसेच कालव्यातून (ROS प्रमाणे) सोडण्यात येत आहे. मांजरा प्रकल्पातून केव्हाही नदीमार्गे विसर्ग सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील इतर मध्यम / लघु प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरले असून त्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येवून मांजरा आणि तेरणा नदीवरील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत आहे. तसेच पुढील दोन-तीन दिवसांत चांगल्या पावासाची शक्यता असल्याने त्यामुळे या नदीकाठच्या सर्व गावानी सतर्क रहावे. संभाव्य पूरपरिस्थिती व विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी खालील काळजी घ्यावी.
1. मुसळधार पाउस सुरु असताना शक्यतो घराबाहेर जाण्याचे टाळावे. कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात जाऊ नये.
2. जिल्ह्यातील जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने कोणीही, जलसाठे पाण्यासाठी / पर्यटनासाठी जाऊ नये.
3. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे. नदीपात्राजवळ घरे असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. आपल्या गरजेच्या वस्तू (उदा. औषधी, रोख रक्कम) स्वतः जवळ बाळगावे.
4. नदीपात्राजवळ आपली मुकी जनावरे बांधू नयेत. मुकी जनावरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
5. सदर कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे.
6. शेतकर-यांनी दुपारी 03 ते 07 या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये कारण सदर कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते.
7. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली/पाण्याच्या स्त्रोताजवळ/विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून स्वतः सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.
8. जलसाठ्याजवळ / नदीजवळ जाऊ नये, आपल्या मुलांना जलसाठ्यावर / नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विध्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे,
9. पुलावरून / नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल / नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये.
10. पाउस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी.
11. स्थानिक पोलीस अधिकारी/ तलाठी/ मंडळ अधिकारी/ ग्रामसेवक/सरपंच/ कृषी सहाय्यक / (शहरी भगात म.न.पा./ न.प. यांचे अधिकारी) यांचेशी संपर्कात राहून ते देत असलेल्या सूचनांचे पालन करावे.
12. आपल्या आप्तेष्टांना तसेच गावक-यांना सावधगीरीची सूचना देवून आपत्ती ती उपाययोजना करावी.
13. आपत्कालीन परिस्थितीत तालुका प्रशासनास खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावे. (विजयकुमार ढगे)
निवासी जिल्हाधिकारी तथा मु.का.अ.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर

0 Comments