भादा येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद विद्यार्थी नागरिकांची गैरसोय
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे पुलावर पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे.यामुळे शाळकरी विद्यार्थी नागरिक यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.
औसा तालुक्यामध्ये भादा येथे असणारा भादा- आनंद नगर वस्तीच्या मध्यभागी असणारा हा जुना पुल निजाम कालीन पूल हा खूप वर्षांपूर्वी झालेला आहे. यामुळे या पुलाची उंची खूपच कमी असल्याने आणि या ठिकाणी येणारे पाणी दूर वरून येते यामुळे किंचितही पाऊस झाला तरी तलाव भरल्यानंतर ते पाणी सरळ या नदी नाल्यांमधून येते यामुळे हा रस्ता बंद पडतो आणि वाहतूक ठप्प राहते.
असाच हा प्रकार शुक्रवार दिनांक 14 ऑक्टोबर 20 22 रोजी सकाळी पासूनच रिमझिम पाऊस सुरू झाल्याने आणि काही वेळाने नंतर जोरदार पाऊस आल्याने या नदी नाल्यांमधून जोरदार पाणी आले आणि पुलावरून पाणी वाहत असल्याने या भागातील या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. यामुळे यापुढील बोरगाव भेटा कोण वडजी आंदोरा जायफळ मुरुडला जाणाऱ्या वाहनांचा येथेच संपर्क तुटला. असा या गावाचा संपर्क पूर्णपणे तुटन्याचा प्रकार पाऊस पडल्यानंतर सतत होतो.
याबाबत प्रशासनाकडे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिक या पुलाविषयी सतत प्रश्न लावून धरतात परंतु याकडे शासनाचे दुर्लक्षच असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
तर गेल्या आठ ते दहा वर्षापासून पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती उद्भवली आणि या मार्गावरील वाहतूक बंद झाली तेव्हा प्रशासनाकडे याबाबतची माहिती गेलेली आहे आणि या पुलाचे काम पावसाळा संपल्यानंतर सुरू होईल अशा अनाभाखा समाज माध्यमाकडून समजतात परंतु हा पूल गेल्या दहा वर्षापासून मंजूर असल्याच्या नावाखाली जैसे थे!अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या बाबीकडे शासनाने आणि प्रशासनाने गांभीर्याने घेऊन या पुलाचे काम त्वरित करणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.





0 Comments