वार्डातील समस्याने सदस्य हैराण; नागरिकांच्या बोलण्याने डबल परेशान
बी.डी.उबाळे
औसा: तालुक्यातील वार्डातील समस्येने ग्रामपंचायत सदस्य हैराण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
औसा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य(टीएस) राहत असलेल्या वार्डामध्ये त्यांना घराकडे जाण्यासाठी पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकासह सर्व त्या भागातील गावकऱ्यांनी त्या सदस्यास सतत खडे बोल? सुनावल्याने ते ग्रामपंचायत सदस्य पूर्णपणे हैराण झाले आहेत. घरचे खायचे आणि लोकाचे बोलणे घ्यायचे काय? अशी सद्भावना निर्माण झाली आहे.
यामुळे आपण ग्रामपंचायत मध्ये असूनही आपण हा रस्ता दुरुस्त, नाली बांधकाम करू शकत नाही आणि सदरील रस्त्यावरील अस्वच्छ पाणी याबाबत आपण काहीही करू शकत नाही याकरिता परेशान झालेले ग्रामपंचायत सदस्य हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सध्या गावांमध्ये आहे.
गाव भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात येत असल्याने गावांतर्गत हा रस्ता खूप मोठे अंतर असल्याने आणि पाण्याची रहदारीही मोठी असल्याने या ठिकाणी सिमेंटची नाली मोठी बनविली पाहिजे तेव्हा या रस्त्यावर पाणी येणार नाही अशी परिस्थिती तयार होईल परंतु ही नाली बनविण्यासाठी मोठे बजेट किंवा निधी उपलब्ध नसल्याने हे काम पेंडिंग पडत आहे तरी या कामाकरिता आमदार निधी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे आणि तो निधी उपलब्ध होतात या ठिकाणी रस्ता आणि नाली बांधकाम पूर्ण केले जाईल असे भादा ग्रामपंचायत उपसरपंच बालाजी शिंदे उर्फ बी एम यांनी सदरील प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


0 Comments