भादा पुलावर पाणी आल्याने वाहतुक ठप्प; नागरिकांची गैरसोय
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे असणारा जुना पूल याची उंची खूप कमी झाली आहे यामुळे हा भादा - मुरुड रस्ता महत्त्वाची अडथळा निर्माण होऊन थोडाही पाऊस पडला तरी वाहतूक दोन-चार तास खोळंबली जाते तर सदरील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने पुलावर्ती मोठे खड्डे पडले आहेत.
यामुळे जाणाऱ्या वाहनांचे मोठ्या प्रमाणात त्या खड्ड्यामध्ये चाकण रुतली जात आहेत जेणेकरून वाहनांचे नुकसान आणि दुचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात या खड्ड्यामुळे नुकसान होऊन अनेक नागरीक या पाण्यामध्ये घसरून पडल्याची माहिती मिळत आहे. यामुळे हा पूल पावसाळा संपल्यानंतर त्वरित होणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत तर हा रस्ता मोठ्या वाहतुकीचा आणि रहदारीचा असल्याने या रस्त्यावरून हजारो वाहनांची रेलचेल सतत सुरू असते तर पुढील आठ ते दहा गावांचा संपर्क या पुलावर पाणी आल्यामुळे तुटला जातो.
यामुळे नागरिकांना समस्यास सामोरे जावे लागत आहे तर गावापासून दूर अंतरावर असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बँक,जि प शाळा असे काही महत्त्वाची शासकीय आणि दैनंदिन जीवनातील आवश्यक बाबीची कार्यालय आणि सेवा देणारी कार्यालय असल्याने नागरिकांना या छोट्या आणि अरुंद फुलाचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबत शासन आणि प्रशासन यांनी या पुलाचे गंभीर दखल घेत या लातूर ग्रामीण मतदारसंघातील भागाची तत्परतेने दुरुस्ती आणि नूतनीकरण करणे आवश्यक आहे ज्यामुळे या भागातील नागरिकांची दैनंदिन वाहतुकीची मोठी सोय होणार आहे.



0 Comments