ऑगस्ट पासून बंद असलेल्या भागात अखेर ग्राम पंचायत ने गावातील विविध भागांत लावले दिवे
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा ग्रामपंचायत ने गेल्या अनेक दिवसापासून आणि जवळपास ऑगस्ट पासून काही भागातील विद्युत बल्ब बंद होते ते लावण्याचे काम आता दिवाळीमध्ये केल्याने नागरिकाकडून अखेर ग्रामपंचायतीने विविध भागातील दिवे लावण्याची विविध भाग उजेडात आणल्याची चर्चा सुरू आहे. भादा तालुका औसा ग्रामपंचायत कडून गावासाठी विविध शासकीय योजनांची निधी उपलब्ध करून विकासाचा पाऊस पाडला जातो.
यामुळे गावामध्ये कोणतीही समस्या असली तर त्या समस्येबाबत सोशल मीडियावर जाहीरपणे त्याची चर्चा केली जाते. यामुळे विविध भागांमध्ये काय समस्या आहेत याची माहिती गावामध्ये केवळ दक्ष नागरिक यांचे समस्येवर लक्ष असल्याने कोणती समस्या गावामध्ये प्रत्यक्ष आहे. याबाबत सोशल मीडियावर चर्चा केली जाते
आणि या चर्चेतूनच गावातील कोणतेही शासकीय कार्यालय किंवा यंत्रणा असो ते निर्णय घेण्याचे काम त्वरित करीत असतात असेच एक तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेली समस्या ही लांबत गेली आणि सात ते दहा ऑगस्टच्या दरम्यान बंद पडलेल्या शिवाजीनगर भागातील जयभीम नगर भाग दिवाळीनिमित्त सुरू करण्यात आला आणि अखेर या भागात ग्रामपंचायतीने दिवे लावले! अशीच चर्चा या भागामध्ये असून नागरिकाकडून याबाबत ग्रामपंचायत आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले जात आहेत.



0 Comments