सावित्रीमाई, महात्मा फुले यांच्या प्रतीरूपाचे केले लक्ष्मी पूजन
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील रहिवाशी असलेले दत्तात्रय चांभारगे- माळी यांनी सध्या सुरू असलेल्या दिवाळीनिमित्त इतर कोणतीही प्रतिमा वापर करण्याऐवजी त्यांनी खरेच मानवतेसाठी लक्ष्मी नारायणाचे काम केलेले आणि मानव उद्धारासाठी आपले आयुष्य आणि आपल्या पूर्वजांची संपूर्ण स्थावर मालमत्ता आणि धन हे केवळ मानवी उद्धारासाठी वापरले अशा महामानवांना खरेच वंदन करणे किती आवश्यक आहे याची प्रचिती ठेवून भादा येथील रहिवासी आणि सध्या पोट भरणी कामी लातूर जवळ पेठ या ठिकाणी राहणारे दत्तात्रय चांभारगे यांनी मोठ्या उत्साहामध्ये या लक्ष्मीपूजन निमित्त सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमा आणि मूर्ती रूपातील फुले दांपत्य यांची मनोभावे लक्ष्मीपूजन केले. याचे इतरही मानवाचे नागरिकांनी अनुकरण करावे याकरिता त्यांनी सोशल मीडियावर आपण केलेल्या लक्ष्मीपूजनाची प्रतिकृती जाहीरपणे जगासमोर मांडली जेणेकरून मानवतावादी नागरिक याचे नक्कीच अनुकरण करेल हाच त्यांचा हेतू असावा. यामुळे त्यांनी जाहीरपणे सोशल मीडियावर याबाबत माहिती प्रसारीत केलेली आहे.
या अशा आधुनिक आणि तात्विक बुद्धिवादी बदल एक मानवतावादी भादेकर म्हणून प्रत्येक नागरिकाला याचा अभिमान असायलाच हवा आणि ' कोणताही धर्म हा मानवासाठी आहे,मानव हा धर्मासाठी नाही! तेव्हा मानवाला जीवनामध्ये जगत असताना केंद्रस्थानी ठेवून कोणतेही कार्य होणे आवश्यक आहे, जेणेकरून धर्माच्या नावावर मानव रूपाला कोणत्याही शारीरिक,मानसिक, आर्थिक इजा होऊ नये. हे धर्माची बाजू घेणाऱ्या किंवा धर्माची भीती दाखवणाऱ्या नागरिकांनी लक्षात ठेवायला हवे' असेच या सदरील लक्ष्मीपूजनावरून दिसून येत आहे.


0 Comments