Latest News

6/recent/ticker-posts

विदेशात जाऊन एम आय टी ची पदवी पूर्ण करणारा पहिला भादेकर भूमिपुत्र-शैलेश शिंदे

विदेशात जाऊन एम आय टी ची पदवी पूर्ण करणारा पहिला भादेकर भूमिपुत्र-शैलेश शिंदे


बी डी उबाळे

औसा: शैलेश शिवाजीराव शिंदे या भूमिपुत्राने ऑस्ट्रेलियात मिळविली एम आय टी ची(सॉफ्ट वेअर इजिनिअर) दोन वर्षांचा अभ्यास करून पदवी मिळविणारे ते भादा येथील पहिले विद्यार्थी आष्ट्रेलियात जाऊन महागडे शिक्षण घेणारे ते भादा भूमिपुत्र तथा औसा पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव शिंदे(दादा) यांचे द्वितीय सुपुत्र आणि पंचायत समिती सदस्य शिवप्रसाद शिंदे यांचे छोटे बंधू शैलेश शिवाजीराव शिंदे यांना एम आय टी ही ऑस्ट्रेलिया येथील सिडनी विद्यापीठाची नामांकित पदवी शुक्रवार दिनांक 7 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11:00 वाजता पदवीदान समारंभात देण्यात आली.


मोठया कठीण परिश्रमाने आणि प्रयत्नाने प्राप्त झालेली ही डिग्री भविष्यात नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. या निमित्ताने या भादेकर सूभूमिपुत्राचे आणि कुटुंबाचे भादा येथील शिक्षण प्रेमी आणि नागरीकाकडून लातूर जिल्ह्यामध्ये आणि औसा तालुक्यात सोशल मीडियावर आणि फोनवर,समक्ष भेटून मोठ्याप्रमाणात अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments