Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील वॉट्स अप ग्रुप "भूमिपुत्र" मुळे मिसींग व्यक्तीचा शोध 12 तासात लागला

भादा येथील वॉट्स अप ग्रुप "भूमिपुत्र" मुळे मिसींग व्यक्तीचा शोध 12 तासात लागला

तुराब पठाण

भादा: दि.19 भादा येथील पोलिस स्टेशन येथे काल दि.18/11/22 रोजी दुपारी मिसिंग क्र.16/22  प्रमाणे दाखल करण्यात आले होते. यातील मिसिंग  इसम नामे-गुरुनाथ गोपीनाथ लुंगसे,वय 22 वर्ष, रा.वरवडा ता. औसा जी. लातूर हा दि.12/09/22 रोजी (अंदाजे एक महिन्यापूर्वी) सकाळी 11.00 वा.दरम्यान स्वतःचे घरून काही न सांगता निघून गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशन भादा कडून आवाहन करून, त्याबाबतचा संदेश भादा व लातूर परिसरातील वॉट्स अप ग्रुपवर पाठवण्यात आला होता.

त्यावरून भादा" भूमिपुत्र" नावाचे वॉट्स अप गृपवरील सजग नागरिक मनोज शिंदे यांनी मिसिंग व्यक्ती हा उस्मानाबाद येथील ऐका हॉटेल येथे कामास असल्याची माहिती दिली. त्यावरून सदर इसमास तेथून ताब्यात घेऊन त्यांचे वडिलांच्या ताब्यात दिले.

सदर ईसम हा अवघ्या 12 तासात "भूमिपुत्र वॉट्स ग्रुप " मुळे मिळून आल्याने भादा पोलिस ठाणे कडून ग्रुपचे ॲडमिन रवी पाटील यांचे व मनोज शिंदे यांचे आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments