Latest News

6/recent/ticker-posts

कोश्यारी यांच्या विधानाचा विरोध म्हणून 25 नोव्हेंबरला औसा बंद

कोश्यारी यांच्या विधानाचा विरोध म्हणून 25 नोव्हेंबरला औसा बंद

शेख बी जी 

औसा: दि.24 भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना इतर व्यक्तींशी केल्याने राज्यात जागोजागी बंदचे आव्हान केले जात आहे. या बंदला जागोजागी पाठिंबाही मिळत आहे.


याचाच भाग म्हणून औसा शहरात 25 नोव्हेंबरला औसा बंद चे अहवान लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक व चुकीचे विधान केल्यामुळे समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.


परंतु केंद्र सरकार याची गंभीर दखल न घेता अश्या प्रवृतीवर कुठलीही कार्यवाही करत नसल्या कारणाने औसा शहर व तालुक्यामधील समस्त शिवप्रेमींच्यावतीने 25 वार शुक्रवार रोजी औसा बंदचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तरी औसामधील सर्व शिवप्रेमी नागरिकांनी तसेच सर्व पक्ष-संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उद्या किल्ला मैदान औसा येथे दि.25 वार शुक्रवार रोजी ठीक सकाळी 9:00 वाजता आपली दुचाकी घेऊन बंदच्या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments