Latest News

6/recent/ticker-posts

जम्मू काश्मीर येथील "धम्मदूत" शिबिरास लातूर येथील बौध्द उपासकांची हजेरी

जम्मू काश्मीर येथील "धम्मदूत" शिबिरास लातूर येथील बौध्द उपासकांची हजेरी


बी डी उबाळे

औसा: भारतीय बौद्ध महासभा सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वा खाली व मार्गदर्शना खाली जम्मू काश्मीर येथे दि 22 ते 26 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत धम्मदूत शिबीर आयोजित करण्यात आले होते.

लातूर जिल्ह्यतून आयु महेश काळे अध्यक्ष देवणी तालुका, आयु विक्रम गायकवाड - उपाध्यक्ष देवणी,आयु अमर सुर्यवंशी हे प्रशिक्षणासाठी गेले होते. त्यांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करून मुळगावी देवणी येथे परतले.

 दि 08 नोव्हेंबर 2022 रोजी  भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर यांच्या वतीने देवणी येथे स्वागत करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष आयु कुमारभाऊ सोनकांबळे, महासचिव आयु रविकांत सिरसाट उपस्थित होते. 

जिल्हा शाखा सचिव विजय मस्के, सचिव भगवान इसाळे, जिल्हा संस्कार प्रमुख सुरेंद्र कांबळे, उपाध्यक्ष महादेव वाघमारे,संपर्क प्रमुख बालाजी उबाळे, जिल्हा संघटक राजीव कांबळे,अरविंद दामावले तसेच तालुका शाखा व सर्व पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले व प्रशिक्षणार्थीना पुढील कार्यास  शुभेच्छा दिल्या आहेत. अशी माहिती औसा तालुका बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मोतीराम कांबळे यांनी सदरील प्रतिनिधीशी दिली आहे.

Post a Comment

0 Comments