Latest News

6/recent/ticker-posts

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये बालदिन उत्साहात

युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये बालदिन उत्साहात

निलंगा: भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवारलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून युनिव्हर्सल पब्लिक स्कूल मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी औराद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाळ शिंदे, पंकज कुलकर्णी आणि श्रुती कुलकर्णी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

सर्व प्रथम पंडित जवाहरलाल नेहरूं यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रेरणास्तव त्यांच्या गुणगौरव करण्यात आला विविध पारितोषिक ही विद्यार्थ्यांना देण्यात आले. विद्यार्थ्यांनी वि विल रेविल ओव्हर कम  ह्या इंग्लिश गाणे संगीताच्या तालावर गायले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून बालदिन साजरा केला.

एलकेजी ते तिसरी वर्गापर्यंत च्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त अशा कलागुणांचा वाव देत विविध कलांचा आविष्कार सादर केला. विद्यार्थ्यांनी राइम्स व गोष्टी इंग्लिश भाषेमध्ये सांगून पालकांना मंत्रमुग्ध केले. गोष्टी खेळ व विविध कलाविष्कार उत्कृष्टपणे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यार्थ्याप्रमाणेच पालकांनी ही भरभरून प्रतिसाद दिला.

Post a Comment

0 Comments