आ.रमेश कराड यांची भेट घेऊन येलोरी गावच्या विविध कामासाठी विकास निधीची केली मागणी
रविंद्र उबाळे
येल्लोरी: आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांची भेट घेऊन येललोरी ता. औसा येथील ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चे दरम्यान माजी सरपंच रत्नाकर मनगुळे माझी भाजपा तालुका उपाध्यक्ष बिराजदार भाजपा युवा मोर्चाचे नेते नागनाथ रिंगणकर यांनी आमदार रमेश कराड यांच्या निवासस्थानी बैठकीत चर्चा केली आणि फुले नगर समाज मदिर, खडोबा मदिरबाधकामासाठी आर्थिक निधी ,वडार वस्तीसाठी सिमेंट काँक्रीट रस्त्याची मागणी, आंबेडकर नगर येथे स्मशानभूमीसाठी शेडची मागणी केली आहे. ही मागणी लवकरच आ. कराड करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

0 Comments