वरवडा गावाकडून रस्त्याचे काम सुरू झाल्याने रोग म्हशीला इंजेक्शन पखालीला
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा व परिसरामधील मागणी गेल्या अनेक वर्षापासून भादा वरवडा रोड भादा -शिवली रोड वाहतूक आणि वाहने जाण्या योग्य करण्यात यावा अशी मागणी असताना सध्या वरवडा तालुका औसा या गावाकडून एक ते दोन किमी अंतराचा रस्ता सुरुवात करण्यात आला असल्याची चर्चा असून हे काम वरवडा गावाकडून सुरुवात केल्याने वरवडा गावच्या नागरिकांना शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून भादेकरांची जी मागणी होती भादा कडून वरवडाकडे जाणारा रस्ता व्हावा त्या मागणीला बाजू देत हा रस्ता वरवडा गावाकडून सुरुवात करण्यात आल्याने सध्या भादा भागामध्ये' रोग म्हशीला आणि इंजेक्शन पखालीलां?' दिले असल्याची चर्चा सध्या भादा व परिसरामध्ये असून या कामी सतत आंदोलनाच्या भूमिकेत असणारे भादेकर यांच्या पदरी नेमके काय पडले? अशी चर्चा सध्या असून
भादा या भागाकडून शेतकरी आणि शिवली वरवडा गावाकडे जाणारे प्रवासी यांची मोठी संख्या असल्याने आणि सतत या भागातून भागावर वडा भादा शिवली हा रस्ता व्हावा अशी मागणी रेटून धरणारे भाडेकर यांच्या मागणीला यश आले की नाही ही बाब वेगळी आहे कारण भादेकर हे सतत विकासासाठी शासन आणि प्रशासना कडे आपली कैफियत मांडत असतात परंतु या कैफियतीला दाद न देता इतरत्र गावाकडून कामे सुरुवात करणे याला प्रशासनाची कोणती कला संबोधायची अशी चर्चा सध्या भादा व परिसरामध्ये जोरदार सुरू आहे तर भादा- शिवली आणि भादा -वरवडा हे रस्ते पूर्ण पणे दुरुस्ती नूतनीकरण होणे आवश्यक आहे जेणेकरून भादा पोलीस स्टेशन हद्द आणि भादा प्राथमिक आरोग्य केंद्र हद्द याकरिता प्रवासाचा मार्ग आणि टप्पा अगदी कमी होऊन विकासासाठी या रस्त्याचा मोठा फायदा होणार असल्याची चर्चा सध्या नागरिकात केली जात आहे.



0 Comments