Latest News

6/recent/ticker-posts

औसा-भादा अर्धवट रस्ता दुरुस्तीने वाहनधारकांची गैरसोय

औसा-भादा अर्धवट रस्ता दुरुस्तीने वाहनधारकांची गैरसोय 

बी डी उबाळे

औसा: औसा येथून सुरू असलेली रस्ता दुरुस्ती काम अर्धवट रस्त्यामध्ये केल्याने नागरिकांची आणि वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र या रस्त्यावर प्रवास करताना दिसून येत आहे.

या रस्त्यावरून दिवसाकाठी हजारो वाहनांची रेलचेल सतत सुरू असते त्यामुळे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून असा मुरुड या बसचाही प्रवास या रस्त्याने जवळपास दिवसाकाठी 16 ते 18 बसेस या रस्त्यावरून धावतात यामुळे हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून सध्या या रस्त्यावरून कारखान्यांचे लोड ची वाहने यामध्ये ट्रॅक्टर ट्रक शिवणे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते परंतु खराब रस्ता असल्याने या वाहनांची ही अनेक वेळा गैरसोय होत असल्याचे चित्र या रस्त्यावर दिसून येत आहे.

औसा येथून सुरू झालेले रस्ता दुरुस्तीचे काम भादा हद्द सुरू होते त्या ठिकाणच्या आसपास अर्धा किलोमीटर च्या जवळपास रस्ता दुरुस्तीच न केल्याने या ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात असून वाहन चालवताना अवजड वाहनचालकांना मोठा त्रास होत असून दुचाकी वाहनांचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून समोरील हेडलाईट,बंपर,इंडिकेटर,साईड ग्लास, डीगी,हे प्रत्येक पार्ट मोटरसायकलीचे लूज होऊन प्रवासा दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहनांचे हे पार्ट खराब रस्त्यामुळे वाहनाच्या अलग होऊन रस्त्यावर पडली असल्याचे दिसून येत आहे.

याकरिता संबंधित गुत्तेदारांनी ते अर्धवट रस्ता दुरुस्ती चे काम करणे आवश्यक आहे.जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही आणि या कामावर नियंत्रक असणारे कार्यालय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग यांनीही या कामाबाबत देखरेख करून काम पूर्ण होते की नाही हे तपासून नागरिकांची प्रवासादरम्यान गैरसोय होणार नाही असे काम संबंधित कंत्राटदाराकडून करून घेणे अपेक्षित असल्याचे मत या रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments