औसा तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत भादा जिल्हा परिषद शाळेचे यश
बी डी उबाळे
औसा: शालेय विद्यार्थी व युवा क्रीडा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी लातूर यांच्यावतीने आयोजित औसा तालुका मैदानी क्रिडा स्पर्धा देवताळा येथील आश्रम शाळेत दि 17 नोव्हेंबर 2022 रोजी पार पडल्या.
या स्पर्धेत भादा येथील दोन्ही प्रशालेतील 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी 19 विद्यार्थ्यानी विविध वैयक्तिक स्पर्धात घवघवीत यश मिळविले. विशेष म्हणजे या शैक्षणिक वर्षांत दोन्ही प्रशालेत मेजर ध्यानचंद क्रीडा नैपुण्य उपक्रम राबविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेत कु आयोध्या विभुते, पल्लवी विभुते, व श्रावणी विभुते या तिघी भगिनींनी धावणे व इतर स्पर्धेत यश मिळविले आहे.
या सर्व स्पर्धासाठी क्रिडा प्रमुख शिवपुजे डी जी, ज्येष्ठ शिक्षिका मंठाळे एस एस, माळी पी व्ही, श्रीमती उबाळे सत्यशिला, गुरव दैवशाला, शेंडे ए बी, केंद्रे डी एम, जगताप के डी व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये 17 वर्ष वयोगट :- मुली धावणे
100 मीटर-विभूते पल्लवी - द्वितीय - 200 मीटर विभूती आयोध्या - प्रथम,1500 मीटर-विभक्ती अयोध्या - प्रथम विभूते पल्लवी - द्वितीय,चौरे समीक्षा-तृतीय,उंच उडी-उबाळे तनश्री - द्वितीय-विभुते अयोध्या - तृतीय
भाला फेक-कोळी स्वप्नाली - व्दितीय,हातोडा फेक-कठारे साक्षी - प्रथम,14 वर्ष वयोगट :-मुली धावणे 100 मीटर- पाटील वैष्णवी - तृतीय,200 मीटर-विभूते श्रावणी - प्रथम,400 मीटर-माळी वेदिका- द्वितीय
उबाळे ऐश्वर्या - तृतीया,600 मीटर-माळी वेदिका -प्रथम,गोळा फेक-बनसोडे दिव्या - द्वितीय थाळी फेक -चांबारगे अंजली - प्रथम उंच उडी,विभूती श्रावणी - प्रथम
17 वर्ष वयोगट :- मुले धावणे-400 मीटर-गायकवाड बालाजी - द्वितीय, 800 मीटर- गायकवाड बालाजी - द्वितीय विशेष म्हणजे या वर्षी प्रशालेने कुस्ती, बुद्धीबळ, कॅरम इत्यादी वैयक्तिक स्पर्धेबरोबरच खो-खो व कबड्डी या सांघिक खेळातही चार चार संघ पाठवून क्रिडा क्षेत्रात दमदार एंट्री केली आहे. व विशेष बाब म्हणजे दि 24 व 25 नोव्हेंबर 2022 या कालावधीत होणाऱ्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे यजमानपदही भादा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला व प्रशाला भादा यानी स्विकारले आहे.
या स्पर्धांसाठी ग्रा प. भादा तर्फे दोन कबड्डीचे, एक खो खो चा, लांब उडी - उंच उडी साठी धावपट्टी, कुस्ती साठी आखाडा इ मैदाने तयार करून दिली असल्याची माहिती मुख्याध्यापक मोहन दत्तोपंत माकणे यांनी दिली.







0 Comments