Latest News

6/recent/ticker-posts

सहा वर्षाचा चिमुकला आर्यन पाण्यात पडून मृत्यु,शिक्षकही झाले भाऊक;सोशल मीडियावर केली भावनेला वाट

सहा वर्षाचा चिमुकला आर्यन पाण्यात पडून मृत्यु,शिक्षकही झाले भाऊक;सोशल मीडियावर केली भावनेला वाट 

बी डी उबाळे

औसा: चिमुकला आर्यन शिंदे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याने शिक्षकासह सर्व नागरिक झाले भावूक. सोमवारी शाळेचा परिपाठ सुरू होत असताना शिक्षकाची नजर आर्यनला शोधत होती. परंतु आर्यन आज दिसणार नव्हता आजच काय पुन्हा केंव्हाही यापुढे तो शिक्षकाना दिसणार नव्हता. अतिशय गुणी,बोलका,हुशार इयत्ता पहिलीचा विद्यार्थी रविवारी दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान आर्यन हा घरी खेळत असताना त्याची खेळणी पाण्याच्या बॅलर मधून काढत असताना त्याचा तोल जाऊन तो पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी अंत झाला. ही अतिशय दुःखद घटना शाळेतील सर्व शिक्षकांना जेव्हा ही समजली तेंव्हा अत्यंत वेदना देणारी घटना ठरली. नुकताच 14 नोव्हेंबरला बाल दिन शाळेत साजरा झाला तेंव्हा त्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा करून आला होता. खूप छान दिसत होता आणि प्रत्येक उपक्रमांमध्ये तो सहभाग घेत होता शाळेत येऊन त्याला सहा महिनेही झाले नव्हते तर तो सर्व विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा लाडका बनला होता आणि ही जेंव्हा घटना कानावर पडली तेव्हा सर्व शिक्षक अस्वस्थ झाले. चिमुकले बाळ आयुष्यात फुलण्या अगोदरच कोमेजून गेलं याच खूप दुःख आम्हा सर्व स्टाफ ना आहे अशी भावना शिक्षक कांबळे यांनी सोशल मीडिया वरून व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments