लातूर जिल्ह्यात भूकंपाचे पुन्हा सौम्य धक्के; जिल्हा आपत्ती व्यवस्थानाने दिली माहिती
लातूर: लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून हे धक्के आज १९ नोव्हेंबरच्या पहाटे २ वाजून ७ मिनीटांनी किल्लारीवाडी व परिसरात जाणवले आहेत. त्याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी भूकंप मापन यंत्रावर नोंदविली गेली असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने आज १९ नोव्हेंबर रोजी दिली आहे.
विशेष म्हणजे या भूकंपाच्या धक्क्यांचे केंद्र देखील पुन्हा किल्लारी परिसर असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातून देण्यात आली आहे.
शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी हे धक्के किल्लारी आणि परिसरात जाणवले. सुमारे पाच किलोमीटरचा परिसर या धक्क्यामुळे हादरला. या भूकंपामुळे किल्लारी मध्ये झालेल्या १९९३ मध्ये भूकंपाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत.



0 Comments