कीर्ती दाल मील येथून ४ बालकामगारांची सुटका
लातूर: येथील कीर्ती दाल मील येथे धोकादायक स्वरूपात काम करवून घेतले जात असणाऱ्या ४ बाल कामगारांची पोलिसांनी सुटका केली असून या प्रकरणी एका व्यक्तीविरूद्ध पोलिसांत बाल व किशोरवयीन कामगार नियमन व निर्मूलन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४ परप्रांतीय असलेले बाल कामगारांना स्वतःच्या फायद्यासाठी धोकादायक मशनरीच्या ठिकाणी नियुक्त करून त्यांचे आर्थीक व शारीरिक शोषण करून कमी वेतन देऊन त्यांच्याकडून जास्त श्रमाचे काम करून घेवून क्रूरपणाची वागणूक दिली जबाबावरून अंबर बरकत शेख रा. खाडगाव रोड, बाबा नगर, लातूर याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागात कार्यरत असणारे पो. ना. प्रकाश सोपानराव जाधव यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुळे हे करीत आहेत.


0 Comments