Latest News

6/recent/ticker-posts

३ लाख ३० हजाराच्या मुद्देमालासह तिघा मोटारसायकल चोरांना अटक

३ लाख ३० हजाराच्या मुद्देमालासह तिघा मोटारसायकल चोरांना अटक

लातूर: लातूर जिल्ह्यातील एमआयडीसी, शिवाजी नगर, रेणापूर, चाकूर आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटारसायकल चोरणाऱ्या तिघा जणांना स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक करून त्यांच्याकडून ८ मोटारसायकली, चार मोबाईल असा एकूण ३ लाख २० हजाररूपयांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक देवरे, पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे, स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बरूरे, पोलीस उपनिरीक्षक शैलेश जाधव, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, नवनाथ हासबे, तुराब पठाण, राम गवारे, सुधीर कोळसुरे, सिद्धेश्वर जाधव, प्रमोद तरडे, नाना बोंग, मोहन सुरवसे, राजेश कणसे, रवी कानगुले, नितीन कठारे, संतोष खांडेकर, प्रदीप चोपणे यांनी

अविनाश धनाजी चव्हाण रा. खाडगाव रोड लातूर, राहुल बब्रुवान शेंडगे रा. समर्थ सोसायटी लातूर, महेश देवीदास सरवदे रा. भोई गल्ली गांधी मार्केट लातूर यांना अटक करून त्यांच्याकडून ८ गुन्ह्यातील ८ मोटारसायकली तसेच ४ मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे.

Post a Comment

0 Comments