Latest News

6/recent/ticker-posts

27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त; 11 व्यक्तीविरोधात 4 गुन्हे दाखल

27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त; 11 व्यक्तीविरोधात 4 गुन्हे दाखल


पोलीस अधीक्ष सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांची कारवाई


लातुर: पोलीस पथकांनी एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून तब्बल 27 लाख 80 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून 11 जणांच्या विरोधात 4 गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात विविध ठिकाणी चोरट्या मार्गाने प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य सुगंधी पदार्थ साठवले आणि त्यांची वाहतूक, विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांना मिळाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम, उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर व अहमदपूर यांनी उपविभागीय चाकूर,अहमदपूर पोलीस ठाणे चाकूर आणि अहमदपूर तसेच लातूर येथील दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार अशा एकूण 25 पोलीस अधिकारी व अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचवेळी धाड टाकत कारवाई करण्यात आली.

यात अहमदपूर तालुक्यातील परवेज इस्माईल शेख, अयाज इस्माईल शेख, गौस तांबोळी, इब्राहिम तांबोळी, निसार बीस्ता, बाळू मुंडे, राजू हामने, जावेद शेख, आसद तांबोळी, सय्यद इब्राहिम, इसाक शेख या 11 जणांच्या विरोधात 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 5 आरोपी फरार आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments