भादेकराच्या सेवेत जिल्हा बँक,शाखा भादा मुख्य चौकात दाखल;गावासाठी चेअरमनची तळमळ भारी
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक,शाखा भादा ही अनेक गावासह नागरिकांची आर्थिक गरज भागविण्यासाठी महत्वाचा दुवा बनली होती परंतु गेल्या काही महिन्यापूर्वी ही बँक इमारत खूपच जुनी झाल्याने ती दुरुस्तीसाठी रिकामी करून ही आनंदनगर, भादा येथे स्थलांतरित करण्यात आली होती. त्यामुळे अनेक वृद्ध नागरिकांचे वृद्धापकाळ मानधन मिळण्यासाठी आणि गावातील नागरिकांच्या सोयी ऐवजी गैरसोय होत होती. जिल्ह्यातील एका वर्तमानपत्रातून ही बातमी प्रकाशित झाली होती. त्या बातमीची दखल घेत भादा विवीध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तकुमार वसंतराव शिंदे यांनी प्रयत्न करून या इमारतीमध्ये कोणती कमतरता आहे याची पाहणी केली आणि ती पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत ही बँक कार्यान्वित करण्यासाठी शुक्रवार दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भादा चेअरमन दत्ताकुमार शिंदे यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र स्वामी, सचिव भास्कर कांबळे, गौतम साळुंके, पाटील, राठोड आणि सर्व बँक कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments