Latest News

6/recent/ticker-posts

नीट - २०२४ परीक्षांमध्ये अवैध रॅकेट चालविणाऱ्या ४ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल

नीट - २०२४ परीक्षांमध्ये अवैध रॅकेट चालविणाऱ्या ४ आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल 


लातूर : वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट-२०२४ परीक्षेतील उमेदवारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या पैशाच्या मोबदल्यात अवैध मदत करण्याचे रॅकेट चालविणाऱ्या ४ आरोपीं विरुद्ध दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचे कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहशतवाद विरोधी पथक नांदेड युनिटमध्ये नेमणुकीस असलेले अवेज मकसूद अहमद काझी, पोलीस उपनिरीक्षक यांनी फिर्याद दिल्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील संशयित हे गैरव्यवहाराचे माध्यमातून पैसे घेऊन परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवीत आहेत अशी गुप्त माहिती एटीएस मधील अधिकाऱ्यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने यातील संशयित यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे मोबाईल फोन मध्ये नीट -२०२४ परीक्षे संदर्भात संशयित माहिती मिळून आली आहे.


गुन्ह्याचे तपासात आरोपी नामे जलीलखा उमरखान पठाण यास अटक करण्यात आली असून इतर फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास श्री भागवत फुंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments