ती मनोरुग्ण महिला कुटुंबात परतली तिच्या चिमुकलीला मायेची ऊब पून्हा मिळाली
औराद शहाजानी : शिरशी हंगरगा ता.निलंगा गावची एक मनोरुग्ण महिला काखेत चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीला घेऊन मयत सालगडी मुलगा व पतीची शेता शेजारील लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर उन वारा पावसाची तमा न बाळगता वाट पहात अनेक वर्षे बसून आसे. ती महीला माझं लातूर परिवाराच्या सहकार्याने सामाजिक कार्यकर्ते राहूल पाटील यांच्या सहानुभूतीच्या स्पर्शाने दुरुस्त झाली आज ती कुटुंबात पून्हा परतली आहे. या वेळी ग्रामस्थांनी राहुलसह माझं लातूर परिवाराचे आभार व्यक्त केले.
शीरशी-हांगरगा ता निलंगा येथील सालगडी मुलगा व पती यांचे शेतकामाच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबात एक मुलगा दोन मुली वेडी आई राहीले. या धक्कादायक घटनेच्या जबरदस्त धक्क्याने ती महिला मनोरुग्ण झाली. एक मुलगा व दोन मुली मायेच्या सावलीला पोरकी झाली. कालांतराने सदर महिला स्वतःच्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीस घेऊन शेता शेजारी असलेल्या लातूर जहीराबाद राष्ट्रीय महामार्गावर ऊन वारा पावसाची तमा न बाळगता दररोज सकाळी बसणे आपल्या मयत मुलाची व नवऱ्याची दिवस मावळे पर्यंत वाट पाहणे हा तिचा नित्यक्रम झाला. कुटुंब रस्त्यावर आल्याने दैना झाली. या घटनेची माहिती माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे यांना कळताच सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील व सहकार्यानी संबंधित महिलेस फेब्रुवारी २०२४ च्या शेवटच्या आठवड्यात रेस्क्यू करून त्या चार वर्षाच्या चिमुकल्या मुलीला मुक्त केले. त्या महिलेला पाटील यांच्या आर टू आर संस्थे मार्फत वरवंड तालुका जिल्हा बुलढाणा येथील डॉ.अशोक काकडे यांच्या दिव्या सेवा प्रकल्प येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले होते. ती महिला अगदी काही महिन्यातच बरी झाली व परत आपल्या गावी घरी दि. २१ जून रोजी पाटील व सहकार्यानी कुटुंबाच्या स्वाधीन केले. आणि परत एकदा तिच्या नवीन जीवनाची एक नवीन सुरवात झाली. याप्रसंगी शिरशी हंगरगा येथील ग्रामस्थ प्रशांत नखाते, सुभाष पाटील आदि ग्रामस्थांनी येथील समाज मंदिरात राहुल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले.
तिला जेव्हा रेस्क्यू करण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिच्या मुलांच्या डोळ्यात आश्रुंसह "माझी आई बरी तर होईल का...? आणी आईची पून्हा भेट होईल का...?" असे भीतीयुक्त प्रश्न होते. मात्र सगळं काहीं संपल असं जेव्हा वाटतं तेंव्हा कुठे तरी एक उमेदही आपल्याला आपल हरवलेलं सर्वस्व मिळवून देऊ शकते असे मत राहुल पाटील यांनी व्यक्त केले.



0 Comments