छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे उद्या लातूरात आयोजन
अतिशय महत्त्वपूर्ण व मार्गदर्शक असणाऱ्या या छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर शिबिरात दहावी व बारावीनंतरचे महाविद्यालयीन शिक्षण व अभ्यासक्रम, महाविद्यालयीन अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, कलमापन चाचणी, शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना व कर्ज योजना, माहिती करिअर प्रदर्शनीचे आयोजन आणि तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवता यावे यासाठीच्या आवश्यक बाबी यावेळी तज्ज्ञांकडून सांगितल्या जाणार आहेत. राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त शालेय, महाविद्यालयीन युवक युवती, पालक यांनी या शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कु. मनिषा बोरुळकर यांनी केले आहे.



0 Comments