Latest News

6/recent/ticker-posts

भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका अंतर्गत महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर

भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका अंतर्गत महिलांची स्वतंत्र कार्यकारिणी जाहीर


बी डी उबाळे 

औसा : भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार व भारतीय बौद्ध महासभा लातूर(प.) जिल्हाध्यक्ष एम.एम.बलांडे यांच्या सुचनेनुसार गुरुवार दिनांक २० जून २०२४ सायंकाळी 06:00 वाजता त्रिरत्न बुद्ध विहार समता नगर औसा येथे भारतीय बौद्ध महासभा औसा तालुका अध्यक्ष ॲड. धम्मदिप डांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन तालुका महिला कार्यकारिणी स्थापन करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महिला जिल्हाध्यक्षा आयुनि.शारदाताई हजारे,आयुनि.वंदनाताई कांबळे जिल्हा सरचिटणीस, आयुनि मायाताई कांबळे जिल्हा  कोषाध्यक्षा, संरक्षण उपाध्यक्ष आयुनि मंगल ताई सुरवसे, भारतीय बौद्ध महासभा लातूर जिल्हा (प) सरचिटणीस आयु.अशोक शिंदे सर उपस्थित होते.बैठकीत चर्चा होऊन खालील प्रमाणे औसा तालुका महिला कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तालुका अध्यक्ष -आयुनि.किर्ती अशोक कांबळे,सरचिटणीस-आयुनि.ज्योती धम्मदिप डांगे,कोषाध्यक्ष -आयुनि.आशा अरविंद कांबळे,उपाध्यक्ष संस्कार-आयुनि. सुरेखा राहुल टेंकाळे व इतर निवडण्यात आली.

तसेच समतानगर महिला शाखाध्यक्ष आयुनि.पुष्पाताई लिंबराज गायकवाड  यांची निवड करण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष ॲड धम्मदिप डांगे यांनी केले तर सुत्रसंचलन सरचिटणीस दिलीप बौद्धवीर यांनी केले.कार्यकारिणीनिवडीनंतर उपस्थितांना जिल्हा अध्यक्ष आयुनि शारदा ताई हजारे व जील्हा सरचिटणीस आयु.अशोक शिंदे सर यांनी मार्गदर्शन केले.आभआर किर्ती ताई कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुनि.जनाबाई जाधव,व माजी तालुका अध्यक्ष आयु.उद्धव लोंढे सर व समता नगर बौद्ध उपासक उपासिका यांनी  परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments