पत्रकार दिपरत्न निलंगेकर यांना मातृशोक
लातूर : दि. २१ - शहरातील बोधे नगर येथील रहिवासी तथा पत्रकार दिपरत्न निलंगेकर यांच्या मातोश्री सत्यभामा प्रभाकरराव निलंगेकर (वय ७३) यांचे आज ह्रदयविकारामुळे निधन झाले.
त्यांच्या पश्चात राजरत्न, शिलरत्न, दिपरत्न, रत्नाकर ही मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यविधी मारवाडी स्मशानभूमीत उद्या दिनांक २२ रोजी सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. अंत्ययात्रा सकाळी ९.३० वाजता बोधे नगर येथील निवासस्थानापासून निघेल. "मराठी अस्मितेचा इशारा" परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

0 Comments