Latest News

6/recent/ticker-posts

झाड लावून आईच्या अस्थींचे विसर्जन...

झाड लावून आईच्या अस्थींचे विसर्जन...


सतीश तांदळे

लातूर : आपल्या आईच्या स्मृती जपण्यासाठी रक्षा नदीत विसर्जन न करता अनेक वृक्ष लावून त्या वृक्षांना विसर्जीत केली. झाडे लावून‌ तिथे अस्थी विसर्जन करुन पर्यावरण व निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. आपल्या आईच्या स्मृती या वृक्ष रुपात जतन करणारे असे हे निलंगेकर कुटुंबीय.

माझं लातूर परिवार, सह्याद्री देवराई, लातूर संस्कृतीचे सदस्य, जेष्ठ पत्रकार दिपरत्न निलंगेकर यांच्या आईचे ५ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. अस्थी, रक्षा विसर्जनाच्या दिवशी  सर्व रक्षा एकत्र करून अनेक लोक पारंपारिक पद्धतीने नदीत विसर्जन करतात पण ही रक्षा आपल्या शेतामध्ये नेऊन अनेक झाडे लावून ती रक्षा झाडांना विसर्जीत करण्यात आली.

शेतामध्ये वडीलांचे स्मृतीस्थळ आहे तिथेच स्मृतीस्थळाजवळ अनेक वृक्ष लावून त्या झाडांना ही रक्षा विसर्जन करून अनेक झाडे लावली. परीवारातील लहान नातू ,नाती पासून जेष्ठांपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला‌. हा असा पर्यावरण पूरक संदेश निलंगेकर कुटुंबियांनी दिला आणि आपल्या आईच्या स्मृतीत अनेक वृक्ष लावले.‌ निलंगा तालुक्यातील शहराजवळ असलेला इनामवाडीचा परीसर हा अतिशय सुंदर असा परिसर आहे. निलंगा शहराच्या निटूर - निलंगा शहराच्या रोडवर निलंगा शहराच्या डावीकडे इमानवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर साधारण एक किलोमीटरवर उजव्या हाताला निलंगेकर कुटुंबियांचे शेत आहे. या शेतामध्ये सर्व कुटुंबियांनी श्रमदान करून खड्डे पाडले कोणी घागरीने पाणी आणले. आणि ही सगळी वृक्ष लावली आधीच या शेतामध्ये इथे मेडशिंगी, कवट बेल कडुलिंब, हिवर, पळस, सिंधी अशी अनेक दुर्मिळ झाडे आहेत. या परिसरात आईच्या स्मृती जपण्यासाठी तुळशीची, नारळाची, वडाची झाडे लावण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे निलंगेकर कुटुंबाचे सामाजिक स्तरांमधून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments