Latest News

6/recent/ticker-posts

PATM - पटवेकर अत्तार तांबोळी मणियार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

PATM - पटवेकर अत्तार तांबोळी मणियार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात


लातूर : PATM - पटवेकर अत्तार तांबोळी मणियार फाउंडेशन च्या वतीने समाजातील लातूर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसह लातूर शहरातील सर्व मुस्लिम समाजातील इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षेमध्ये 90% पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा दिनांक 29 जून रोजी सायंकाळी बाद मगरीब नमाज नंतर MK फंक्शन हॉल 60 फीट रोड येथे पार पडला. या कार्यक्रमांमध्ये 125 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मौलाना मुक्ती अब्दुल गणी, अब्दुल हाफिज खतिम यांनी कुराण पठण केले. रहमान गफार सय्यद, सादिया रसूल मणियार या विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. पारंबी कार्यक्रमाचे अध्यक्ष एम. मोईनुद्दीन मणियार यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मंचावर प्रमुख उपस्थिती असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी विद्यार्थ्याला येणाऱ्या अडचणीला सोडवण्याचे बोलून भविष्यात कधीही गरज भासल्यास आवश्यक ती मदत केली जाईल बोलून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंचावर  शफयोदिन पटवेकर, नईमभाई अतार, ताहेर सौदागर(tm) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदर फाउंडेशन चे सहसचिव शादाबभाई पटवेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध सूत्रसंचालक गालिब शेख व रशीद कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन सदर फाउंडेशनचे अध्यक्ष सरफराज(बाबा) मणियार यांनी आभार मानले.

खाजा मणियार, जफरभाई पटवेकर, हबीब मणियार, Adv. आबिद मणियार, गफार(सर) सय्यद, फारुख तांबोळी, Adv.कलीम मणियार, सुनील सिरसाट, पत्रकार- के वाय पटवेकर अदिने परिश्रम घेतले.

स्नेहभोजनाच्या कार्यक्रमानंतर एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये विविध विषयावरती विचार मंथन करण्यात आले. फाउंडेशनची पुढील दिशा ठरवण्यात आली या बैठकीला सदर फाउंडेशनचे मुख्य कार्यकारणी पदाधिकाऱ्यांसह समदभाई पटवेकर, अन्वर मणियार, महबूब तांबोळी, गफार पटवेकर, Adv. रिहाना तांबोळी, अफसर सय्यद, इसाक पटवेकर, सय्यद अलीम, सलाउद्दीन मनियार, जावेद मणियार, सादिक चौधरी, तबरेज तांबोळी, अहमद तांबोळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments