क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूलचा खेळाडू दत्ता संतोष फड राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चमकला
लातूर : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला देशभरातून बऱ्याच राज्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला विशेष साउथ आफ्रिकेच्या एका टीमनेही आपली हजेरी दर्शवली.
या स्पर्धेत कुमते-WKF व काता या खेळ दोन्ही प्रकारामध्ये रजत पदक प्राप्त केले. अशिहरा कराटे इंडिया चे प्रमुख सी.ए तांबोळी यांच्या हस्ते पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
वरील यशस्वी खेळाडूंचे क्राईस्ट इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, तळेगाव, अहमदपूर संस्थाध्यक्ष जीवनकुमार मद्देवाड, सीईओ रितू मद्देवाड, प्राचार्य जेबाबेरला नादार, शाळा समन्वयक संगमेश्वर ढगे, सूर्यकांत गोरे, फुटबॉल कोच- ईस्माईल शेख, राहुल अडसूळ, अशिहरा कराटे असोसिएशन लातूर चे अध्यक्ष के वाय पटवेकर यांनी अभिनंदन केले. यशस्वी खेळाडूला कराटे प्रशिक्षक विक्रम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.


0 Comments