Latest News

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अशफाख मोहम्मदअली तांबोळी याचे यश

ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अशफाख मोहम्मदअली तांबोळी याचे यश

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला देशभरातून 10 राज्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला विशेष साउथ आफ्रिकेच्या एका टीमनेही आपली हजेरी दर्शवली.

काळेवाडी, पुणे येथील वास्तव्यात असलेले मूळचे लातूर जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय मार्शल आर्ट खेळाडू अशपाख मोहम्मदअली तांबोळी यांनी राष्ट्रीय आशिहरा कराटे स्पर्धेत सबाकी,WKF- कुमीते,क्लीकर या तीन खेळ प्रकारामध्ये फाईट करत तिन्ही प्रकारांमध्ये रजत पथक प्राप्त केले.

विशेष त्याने आंतरराष्ट्रीय खेळाडू सेलवींन पाई (साऊथ आफ्रिका) यांच्यासोबत झालेली सबाकी फाईट विशेष ठरली अवघ्या अर्धा पॉईंट ने त्याची सुवर्णपदक हुकले.

यावेळी त्याला कराटेतील 1 St Dan  ब्लॅक बेल्ट{आंतरराष्ट्रीय} हुसेन नारकर ( वर्ल्ड हेडमास्टर- अशिहारा कराटे इंटरनॅशनल ) सी. ए. तांबोळी (अध्यक्ष- अशिहरा कराटे इंडिया ) यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. वरील यशाबद्दल त्याचे ओमरकासिम तांबोळी, पटवेकर अत्तार तांबोळी मणियार फाउंडेशनची उपाध्यक्ष- के वाय पटवेकर, आत्माराम घोगरे, आदित्य बुक्की, नदीम तांबोळी आदिने त्यांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments