Latest News

6/recent/ticker-posts

मसला येथील तीन खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चांगली कामगिरी

मसला येथील तीन खेळाडूंची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत चांगली कामगिरी


लातूर : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला देशभरातून 10 राज्यातून खेळाडूंनी सहभाग नोंदवला विशेष साउथ आफ्रिकेच्या एका टीमनेही आपली हजेरी दर्शवली.

या स्पर्धेत मसला ता जि लातूर येथील तीन यश संपादन केले यामध्ये रूद्र दयानंद धुमाळ {कांस्यपदक}, महेश शिवहार धुमाळ{सहभाग} भगतसिंग विद्यालये वाघोली( भिसे) ता. जि. लातूर व सृष्टी अश्रुबा पाखरे {कास्यपदक} जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मसाला ता. जि. लातूर वरील खेळाडूंना कराटे प्रशिक्षक बालाजी राजमाने यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडूंचे मसला गावाचे सरपंच- नरेंद्र अल्टे, उपसरपंच- सौ. अक्षता धुमाळ, वि.का.स.सो.मसाला चे चेअरमन- चंद्रकांत वांगस्कर, अशिहरा कराटे असोसिएशन, लातूर चे अध्यक्ष- के वाय पटवेकर, रामेश्वर पाटील, अशोक सावंत, सज्जन वांगस्कर, शिवहार धुमाळ, अश्रुबा पाखरे, सुभाष धुमाळ, सिद्धेश्वर वांगस्कर, हणमंत राजमाने, जि.प.प्रा.शा. मसला शाळेचे मु.अ.श्री.कदम, सहशिक्षिका अर्चना मुलगे आणि सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments