Latest News

6/recent/ticker-posts

पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप उत्साहात

पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप उत्साहात

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे - बालेवाडी, पुणे येथे ऑल इंडिया अशिहरा कराटे अँड सबाकी चॅम्पियनशिप- 2024 आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला देशभरातून तामिळनाडू, वेस्ट बंगाल, तेलंगणा, छत्तीसगड, गुजरात सह इतर राज्यातूनही खेळाडूंनी सहभाग नोंदवला. विशेष सेयचेललेस व साउथ आफ्रिका या देशाच्या एका टीमनेही आपली हजेरी लावली. या स्पर्धा 7 जुलै ते 10 जुलै दरम्यान उत्साहात संपन्न झाले.

राष्ट्रीय आशिहरा कराटे स्पर्धेत सबाकी, WKF- कुमीते, क्लीकर फाईट, काता या चार खेळ प्रकारामध्ये घेण्यात आल्या. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेमध्ये एक दिवशी कराटे प्रशिक्षण शिबिर मूळचे भारतीय वंशाचे साऊथ आफ्रिकेचे हुसेन नारकर { वर्ल्ड हेडमास्टर- अशिहारा कराटे इंटरनॅशनल } यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने व स्वतः कांचो- हुसेन नारकर यांनी प्रशिक्षण दिले.

WKF- कुमीते मध्ये प्रथम पारितोषक महाराष्ट्र आणि पटकावला. तर द्वितीय पारितोषक वेस्ट बंगाल ने पटकावला. तृतीय पारितोषकाचा मानकरी तामिळनाडू हे राज्य राहिले. या स्पर्धेचे मुळ आकर्षण सबाकी म्हणजे फुल कॉन्टॅक्ट फाईट यामध्ये पण महाराष्ट्राने पहिलं पारितोषक पटकावले. तर द्वितीय गुजरात ने पटकावले. तृतीय पारितोषकाचा मानकरी छत्तीसगड राज्य राहिले. वरील विजयी संघांना सी. ए. तांबोळी (अध्यक्ष- अशिहरा कराटे इंडिया) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बक्षीस वितरण समारंभामध्ये इतर मान्यवरांच्या हस्ते व कांचो- हुसेन नारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये इंटरनॅशनल कराटे मधील विविध Dan परीक्षेचे बेल्ट व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामध्ये ब्लॅक बेल्ट 5 th Dan- खय्युम तांबोळी, ब्लॅक बेल्ट 4 th Dan- के वाय पटवेकर, मनोज बरडे, ब्लॅक बेल्ट 3 rd Dan- युसुफ शेख, विक्रम गायकवाड, ब्लॅक बेल्ट 1 st Dan- अशफाख तांबोळी, आदित्य बुक्की सह इतर खेळाडूंना प्रदान करण्यात आले.

वरील स्पर्धेकरिता दया शंकरपाल (मुंबई), जयदेव माह्मणे(पुणे) , आत्माराम घोगरे (पुणे) , राजेश झा (वेस्ट बंगाल) , प्रसन्न घोस (वेस्ट बंगाल) , गौतम मलिक (वेस्ट बंगाल) , पी गोपाल कृष्ण (तामिळनाडू ) , प्यांविन आमीन (गुजरात) , सेव्हरीश डे (छत्तीसगड) सोनम केवात ( मुंबई) , बालाजी राजमाने (लातूर) , विक्रम गायकवाड (लातूर) , युसुफ शेख (लातूर) आदिने स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष खैरनार यांनी केले तर आभार अशपाख तांबोळी, आदित्य बुक्की यांनी मानले. स्पर्धा यशस्वी साठी बापू घुले व त्यांच्या टीमने परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments