मयत सचिन सूर्यवंशी हत्याप्रकरणी देवणी येथे विविध संघटनेच्या वतीने सोमवारी बंद व रस्ता रोको
देवणी :(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) तालुक्यातील नेकनाळ येथील मयत सचिन शिवाजी सूर्यवंशी यांचा हत्येचा निषेध म्हणून दि २२ - ७ - २०२४ रोजी वार सोमवार या दिवशी सर्व समाज बांधवांच्या वतीने व विविध संघटनेच्या वतीने घटनेचा निषेध म्हणून देवणी कडकडीत बंदचे आवाहन व बोरोळ चौक येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे. असल्याचे निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे देवणी तसेच मार्केट कमिटी अध्यक्ष यांना देण्यात आले आहे. यावेळी संदीप शिवाजी सूर्यवंशी, बालाजी बनसोडे, महादेव कांबळे, गणेश कांबळे, अक्षय शिंदे, आत्माराम गायकवाड, नितीन गायकवाड, पांडुरंग सूर्यवंशी, डॉ मधुकर कांबळे, जितेंद्र सूर्यवंशी, ज्ञानेश्वर कांबळे, रविकिरण कांबळे, सिद्धार्थ कांबळे, लक्ष्मण रणदिवे, भैय्यासाहेब देवणीकर उपस्थित होते.

0 Comments