Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर परिवाराच्या मोफत पंढरपूर वारीला याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद

माझं लातूर परिवाराच्या मोफत पंढरपूर वारीला याही वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद


ग्रामीण भागातील २०१ वारकरी  ४ ट्रॅव्हल्स,मोफत पंढरपूर वारी उपक्रमाचे ३ रे वर्ष

लातूर : आषाढी एकादशी निमित्त माझं लातूर परिवाराने हाती घेतलेल्या मोफत पंढरपूर वारी उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील २०१ भाविक वारकऱ्यांना ४ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून वारी घडवून आणण्यात आली. सकाळी ७.०० वाजता शहरातील ५ नंबर चौक येथून विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती.

या वारीत प्रामुख्याने भोईसमुद्रगा, जवळा, गाधवड, तांदुळजा, रांजणी, घारगाव, शिराढोण, चौसाळा या ग्रामीण भागातील भाविक वारकऱ्यांचा समावेश होता. प्रवासादरम्यान सर्व भाविकांच्या फराळाची उत्तम सोय देखील अगदी मोफत करण्यात आली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्व भाविक भक्त लातूर येथे सुखरूप परतले.

या उपक्रमात माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, रुद्राक्ष ट्रॅव्हल्सचे सोमनाथ मेदगे, राधिका ट्रॅव्हल्सचे डॉ जुगलकिशोर तोष्णीवाल, बालाजी सुर्यवंशी, अमोल लोहारे, श्रीराम जाधव, धीरज चव्हाण, श्रीमंत बोयणे यांनी पुढाकार घेतला होता. 

कोरोना काळात पडलेल्या खंडानंतर माझं लातूर परिवाराने २०२२ साली हा उपक्रम पहिल्यांदा राबविला. त्यावेळी तब्बल १३०० वारकरी २८ ट्रॅव्हल्स, ३ रुग्णवाहिका आणि ३२ स्वंयसेवक यांच्यासह ऐतिहासिक मोफत वारी केली होती. तर २०२३ साली ३ ट्रॅव्हल्स आणि १५१ ग्रामीण भागातील भाविक वारकऱ्यांना मोफत वारी घडवून आणली होती.

Post a Comment

0 Comments