अनिल चव्हाण यांची लातूर जिल्हा सेवादल काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड
नळेगाव : नळेगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य अनिल चव्हाण यांची लातूर जिल्हा सेवादल काँग्रेस च्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती चंद्रकांत मद्दे, जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष शिराजौदिन जहागीरदार, अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पवार, चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास महाजन, अहमदपूर तालुका तालुका अध्यक्ष प्रकाश ससाने, श्रीकांत बनसोडे, सुनील भोसले, माजी चेअरमन दयानंद मानखेडे व इतर पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्राचे युवा नेते अमित देशमुख यांनी अनिल चव्हाण यांना लातूर जिल्हा सेवादल काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल अमित देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, आमदार अमित भैय्या देशमुख, लातूर ग्रामीण चे आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वात सेवादलच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उत्तम कार्य घडो ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
चाकूर अहमदपूर मतदारसंघाला एक जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याबद्दल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण संचारला आहे येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर मतदारसंघातील काँग्रेस ला उभारी देण्याचं काम अनिल चव्हाण यांच्या मार्फत होईल अशी आशा मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे. या निवडीबद्धल लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष श्रीशेल्य उटगे, विजय देशमुख, अभय साळुंके, प्रदेश सचिव हेमंत पाटील चाकूर, तालुका अध्यक्ष विलासराव पाटील, सौ ज्योतिताई पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


0 Comments