Latest News

6/recent/ticker-posts

इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर शहरात मोफत रुग्णवाहिनेकेचे लोकार्पण

इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीने इंदापूर शहरात मोफत रुग्णवाहिनेकेचे लोकार्पण 


राजकुमार भंडारी

पुणे: इंदापूर तालुक्यातील इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीने जनसंपर्क कार्यालय उद्घाटन तसेच रुग्णवाहिका लोकार्पण, रक्तदान शिबिराचे उद्घाटन, माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री, राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. गोरगरीबाची सेवा करण्याचा ध्यास, इंद्रप्रस्थच्या माध्यमातून प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ (अण्णासाहेब) मंजुळे करीत आहेत.


 लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक कार्यात, आगामी काळात कमी पडणार नाही, अशी ग्वाही आमदार भरणे यांनी दिली. माजी मंत्री पाटील म्हणाले की, सामाजिक जाणवेतून काम करणारे युवक खऱ्या अर्थाने इंदापूर तालुका इतर भागातून काम करतात. रक्तदानाचे महत्त्व, इंद्रप्रस्थच्या कार्यकर्त्यांनी जाणले असल्यामुळे रक्तदान चळवळ उभी केली आहे. रक्तदान ही फार मोठी गरज आहे. त्यामुळेच जीव वाचू शकतात, रक्तदानच श्रेष्ठ दान, या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असल्याचा कार्याचा गौरव यावेळी त्यांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, आबासाहेब देवकते, अतुलभाऊ व्यवहारे, प्रकाश शिंदे, बाळासाहेब ढवळे, गजानन गवळी, पोपट शिंदे, अमर जगदाळे, राजेंद्र गोलांडे, चांगदेव ढूके, प्रशांत गलांडे, ज्योतीराम पेटकर, अर्जुन पेटकर, शत्रुघ्न शिंदे, विजय सिद, दत्तात्रय पांढरे, राहुल पाटील, शिवाजी भोई सह राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात युवकांनी रक्तदान केले. इंद्रप्रस्थ युवा प्रतिष्ठानच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन सामान्य नागरिकांच्या हस्ते केल्याने जनसमुदायांनी कौतुक केले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ (आण्णा) मंजुळे यांनी प्रास्ताविक केले. संजय व्यवहारे यांनी आभार मानले.


 

Post a Comment

0 Comments