Latest News

6/recent/ticker-posts

चापोली येथे दोन दिवसीय तब्लीगी इज्तिमा उत्साहात

चापोली येथे दोन दिवसीय तब्लीगी इज्तिमा उत्साहात

चाकुर:{ रियाज मणियार } सध्याच्या धकाधकीच्या युगात माणसांतील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासण्याची आवश्यकता असून, विश्वशांतीची गरज आहे. यासाठी इज्तिमाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन हाजी युसुफभाई एसटी (संभाजी नगर) यांनी केले. चाकूर तालुक्यातील तालुकास्तरीय इज्तेमा चापोली येथे गुरुवारी संपन्न झाला, चापोली ता. चाकुर येथे बुधवारी इज्तिमाचा पहिला दिवस व गुरुवारी दुसरा उत्साहात पार पडला. सकाळी 6:30 वाजता रौफभाई, दुपारी मुफ्ती साहेब (पुणे), संध्याकाळी 7:00 वाजता युसुफभाई एसटी (औरंगाबाद), यांनी उपस्थितांना संदेश दिला. दरम्यान, बुधवारी व गुरुवारी चाकुर, वडवळ, शिरूर ताजबंद, नळेगाव व शिरूर अनंतपाळ सीमाभागातील सुमारे पाच ते सहा हजार मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. या इज्तेमासाठी विविध सोयीसुविधा पुरवन्यात आल्या. यामध्ये डॉक्टर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवेचीही सोय करण्यात आली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी सुमारे २ एकर परिसरात नायगाव रोड, जवळील कपिल पाटील यांच्या शेतात सोय करण्यात आली होती. मुख्य मंडप मस्जिद परिसरात उभारण्यात आला. यामध्ये विविध गावांच्या भागासाठी भोजन, पिंडालाची सोय करण्यात आली. बुधवारी आमदार बाबासाहेब पाटील, माझी जिल्हा परिषद सदस्य पुंडलिक चाटे व अनेक मान्यवरांनी इज्तिमा भेट दिली. सुरक्षेसाठी चाकुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावले.

Post a Comment

0 Comments