Latest News

6/recent/ticker-posts

ग्राम पंचायत अन् भादेकरांच्या भूमिकेने रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आता गावातून ही वाहतुकीचा मार्ग सुरळीत

ग्राम पंचायत अन् भादेकरांच्या भूमिकेने रस्त्याने घेतला मोकळा श्वास; आता गावातून ही वाहतुकीचा मार्ग सुरळीत

बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा ग्रामपंचायत आणि भादेकरांच्या समजूतदार भूमिकेमुळे रस्त्याने घेतला मोकळा श्वास आणि वाहतुकीचा मार्ग होणार सुरळीत गेल्या अनेक वर्षापासून भादा ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत पासून नागरिकांनी पायऱ्या, ओटे आणि बसण्यासाठीचे कट्टे हे अगदी वाहतुकीस अडचण होईल अशा पद्धतीने जवळपास रस्त्यावर आले होते. आणि एकाने केलेले पाहून अनेक जण त्याच पद्धतीने रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणे सुरू होते.. यामुळे सध्या या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

याकरिता काही प्रमाणात का होईना हा रस्ता मोठा होणे आवश्यक होते. याकरिता हाती घेण्यासाठी जास्तीत जास्त दक्ष नागरिकांनी एकत्रित येऊन सदरील रस्त्यावरील अतिक्रमणित भाग खुला करून देण्याचा एक विचार होऊन सर्वच रस्त्यावर आलेले अतिक्रमण काढण्याबाबत एकमत झाले आणि ग्रामपंचायतीचे उपसरपंच बालाजी शिंदे, राम पाटील, राजेंद्र गाडेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, हनुमंत दरेकर आणि इतर सामाजिक कार्यकर्ते आदींनी रस्ता रुंदीकरण होण्यासाठी रस्त्यावर आलेले ओटे, कट्टे, पायऱ्या काढण्याचे काम सदरील संबंधित व्यक्तींना बोलून ते काढण्याची मानसिकता तयार केली आणि ते अतिक्रमणित भाग मोकळा करून देण्याचे काम केले सुरू केले. त्यामुळे या रस्त्यावरून असणारी मोठी वाहतूक औसा ते मुरुड ही व्यवस्थित रित्या सुरळीत होईल हाच प्रयत्न ग्रामपंचायत आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात या रस्त्यावर वाहतुकीमध्ये सुरळीतपणा येईल इतकी व्यवस्था सध्या तरी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.कारण या रस्त्यावरून वाहतूक करीत असताना समोरून एखादे मोठे वाहन आले तर बाजूने एखादी मोटरसायकल सुद्धा पास होणे अत्यंत कठीण होते. कारण येथील रहिवासी नागरिकांनी रस्त्यावर दगड माती विटा वाळू मुरूम, दगड गोटे, कट्टे आणि पायऱ्या याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले होते. हे अतिक्रमण काढण्याची आतापर्यंत कोणीही कसलीही तसदी घेतली नाही त्यामुळे अनेक बेशिस्त नागरिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यासाठी पुढे पुढे येत होते परंतु आता हा सिमेंट रोड नवीन होत असल्याने अतिक्रमण करणे थांबेल आणि हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होईल अशी स्थिती सध्या दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments