Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील कन्या शाळेतील क्रीडांगणाला निधी मिळविण्यासाठी भादेकरानी गाठली मुंबई

भादा येथील कन्या शाळेतील क्रीडांगणाला निधी मिळविण्यासाठी भादेकरानी गाठली मुंबई


बी डी उबाळे 

औसा : तालुक्यातील भादा येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला शाळेसाठी क्रीडांगण आवश्यक होते. जेणेकरून क्रिंडांगणामुळे मुलींचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक आहे.

याकरिता भादेकर भूमिपुत्रांनी मुंबई गाठून क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची भेट घेऊन भादा येतील शाळेचा कायापालट व्हावा आणि मुलीसाठी क्रीडांगणाचे व्यवस्था व्हावी याकरिता क्रीडा व युवक कल्याणमंत्री  संजय बनसोडे यांच्या सतत संपर्कातील कार्यकर्ते तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शिवलकर यांच्या सोबत भादा येथील शालेय समितीचे सदस्य भुजंग चंबारर्गे, सचिन मुकडे, सोमनाथ बनसोडे यांनी शाळेतील क्रीडांगणासाठी 07 लाख 50 हजार रुपये चा निधी मंजूर करून आणलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

याकरिता क्रीडा युवक कल्याणमंत्री संजय बनसोडे आणि हा निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भादेकर टीमचे सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

0 Comments