Latest News

6/recent/ticker-posts

कृषी अभ्यासाला नवीन दिशा,रांगोळीतून रेखाटला गावाचा नकाशा

कृषी अभ्यासाला नवीन दिशा,रांगोळीतून रेखाटला गावाचा नकाशा


राजकुमार भंडारी

पुणे: डॉ. शरदचंद्र पवार कृषि महाविद्यालय बारामती येथील कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत  गावामध्ये शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी विविध प्रात्यक्षिकयुक्त उपक्रम रावबत आहेत.

त्यातीलच एक भाग म्हणून त्यांनी माळवाडी या गावाचा नकाशा रांगोळीतून रेखटला. रांगोळीमध्ये गावातील प्रमुख ठिकाणे, रस्ते, उपलब्ध सुविधा सूची द्वारे अगदी अचूक दर्शवल्या होत्या. रांगोळी तून आपल्या गावाचा नकाशा पाहून गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा झाला होता.डिजिटल मॅप तर नेहमीच पाहण्यात येतात पण रांगोळीतून गावाचा नकाशा काढणे ही मुळातच एक उल्लेखनीय कल्पना होती. माळवाडी या गावात तीन महिने मुक्काम करून कृषिकन्या गावातील शेतीविषयक अभ्यास करणार आहेत. याच अभ्यासांतर्गत त्यांनी गावाच्या नकाशातून गावातील शेती, गावठाण, रहदारी तसेच लागवडीची जमीन, गावात लागवड करण्यात येणारी विविध पीके अशा सर्व बाबी उत्कृष्ट रित्या रेखाटल्या होत्या. या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच सौ.उज्वला खलाटे, उपसरपंच सौ.नंदा सोनवणे, इतर ग्रामपंचायत सदस्य, व्यासपीठ उपलब्ध करून देणारे नाना दनवले, माजी उपसरपंच दिलीप बनकर, कृषी सहाय्यक सोनवणे साहेब आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम कृषिकन्या प्रगती पवार,  ईशा हिरणावळे, जानवी मुसळे, तनया काटकर, अनुजा गवळी, साक्षी जाधव आणि सिद्धी पुंडे यांच्याकडून आयोजित केला होता. गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कृषिकन्यांचे कौतुक देखील केले. कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.पी. गायकवाड आणि प्रा.एस.व्ही बुरुंगले यांचे मार्गदर्शन या कृषिकन्यांना होत आहे.

Post a Comment

0 Comments