भादा गावात विविध ठिकाणी रस्ता काम सुरू पण वाहतूक मार्ग बंद; नागरिकांची गैरसोय
बी डी उबाळे
औसा: तालुक्यातील भादा येथे विविध शासकीय विविध योजनांमधून गावांतर्गत रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आले असून मुख्य रस्ता सोडला असता गावांतर्गत छोट्या गल्ली आणि रस्त्याने काम सुरू
करण्यात आले आहे. परंतु नागरिकांना वाहतूक करण्यासाठी किंचितही रस्ता सोडला नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे संबंधित गुत्तेदारांनी याची दक्षता घेणे आवश्यक होते परंतु नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे संबंधित गुत्तेदारानी माझे काही देणे घेणे नाही ? या पद्धतीने रस्ते खोदकाम करून त्यावर मोठ्या प्रमाणात खडी फोडण्यात आली आहे परंतु दोन ते तीन दिवसाने त्यावर रोलर न फिरविल्याने सदरील छत्रपती शिवाजी नगर येथील भादा ते कोरंगळा या रस्त्यावर नागरिकांना चालता येत नाही आणि नागरिकांना या भागामध्ये किराणा दुकान, पिण्याचे पाण्याची व्यवस्था व इतर कोणतीही सुविधा नसल्याने नागरिकांना मुख्य रस्त्याकडे सतत ये जा करावे लागते परंतु रस्ता नसल्याने अनेक नागरिक सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्ता ओलांडत असताना चिखलातून जातात आणि अनेक वेळा घसरून पडतात तीच अवस्था वाहनांची ही झालेली आहे परंतु सदरील कामाचे गुत्तेदार हे मात्र या बाबीकडे गांभीर्याने घेत नाहीत तर हा रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी जर सुविधा नाही केली आणि नागरिकांची दैनंदिन वाहतुकीची परेशानी केली तर रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे जाईल की नाही ? हे नागरिकांच्या मनस्थितीवर आहे. याकरिता सदरील गुत्तेदारांनी नागरिकांना दैनंदिन कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि शेतीकडे घराकडे दुकानाकडे आणि दैनंदिन रोजी रोटी कमविण्यासाठी त्या रस्त्यावरून ये जा करण्यासाठी छोटासा रस्ता व्यवस्थित करून द्यावा अन्यथा याबाबत नागरिकांचा असंतोशास सामोरे जावे लागेल हे या रस्त्याबाबत नक्कीच दिसून येईल अशी चर्चा सध्या या भागातील नागरिक करीत आहेत. तर या बाबीकडे ही भादा गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीचे सर्व जबाबदार सदस्य यांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.


0 Comments