लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्यासह चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवा पदक
लातूर : नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असलेले पोलिस अधिकारी नक्षलग्रस्त भागात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा देतात. त्या अधिकाऱ्यांना पोलिस महासंचालकाकडून विशेष सेवा पदक जाहीर होते. लातूर पोलीस दलातील तीन पोलिस अधिकारी व पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव येथील दोन पोलीस अंमलदार अशा एकूण पाच अधिकारी, अमलदारांना ‘विशेष सेवा पदक' जाहीर झाले आहे.
नक्षलग्रस्त भागात खडतर सेवा पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना हे पदक दिले जाते. विशेष सेवा पदक जाहीर झालेल्यांमध्ये पोलिस अधीक्षक, सोमय मुंडे, उदगीर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अक्षय माधवराव पाटील, पोलीस ठाणे किनगाव येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक गजानन व्यंकटराव तोटेवाड, तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव येथे कार्यरत पोलीस अंमलदार अभिमन्यू अशोक गाडवे व पोलीस अंमलदार दत्ता हवाप्पा मडोळे अशी लातूर जिल्ह्यात सध्या कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस अधिकारी, अमलदारांची नावे असून नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामधील अतिशय दुर्गम भागात त्यांनी केलेले कर्तव्य व दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.


0 Comments